अंबाजोगाईत हि अॅंटिजेन टेस्ट घेण्यात यावी :- अक्षय भुमकर

 

अंबाजोगाई (प्रतिनिधी) — 

दिवसेंदिवस कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असुन प्रतिष्ठीत व व्यापारी लोक हे मोठ्या प्रमाणात अनेक लोकांच्या संपर्कात येत असुन असे अनेक जण कोरोना पाॅझिटिव्ह झाले आहेत त्या मुळे हि साखळी मोडित काढण्यासाठी अंबाजोगाई शहरात हि लवकरात लवकर सर्व व्यापारी दुकानदार ,भाजी विक्रेते,  भाजी चे ठोक व्यापारी, किराणा दुकानदार ,मेडिकल दुकानदार यांच्या अॅंटिजेन टेस्ट करून घ्याव्यात अशी मागणी युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी केली असुन त्याच बरोबर कोरोना ला आळा घालण्यासाठी   काहि दिवस शहर लाॅकडाऊन ची हि मागणी करण्यात आली आहे .

 या मुळे जे जे व्यापारी व लोक दररोज अनेक नागरिंकाच्या संपर्कात येत आहेत  आशा सर्व व्यापारी नागरिकांच्या टेस्ट करून घेतल्या तर या कोरोना रूग्णांची वाढती संख्या कमि होईल व रूग्ण सहवासाचि साखळी तुटण्यास मदत होईल व यामुळे अनेक पाॅझिटिव्ह रूग्ण समोर येतील.  यातुन त्यांचा इतर लोकांशी होणारा संपर्क तात्काळ थांबेल  व  वाढत्या रूग्ण संख्येला आळा बसेल असे मत युवासेना  केज-अंबाजोगाई विधानसभा  चिटणीस अक्षय भुमकर यांनी व्यक्त केले आहे.!

Popular posts
वाढदिवसाचा खर्च टाळून कु.गौरी अनिल लोमटे या विद्यार्थिनीने जय भारती प्रतिष्ठानच्या मोफत जेवण उपक्रमास स्वेच्छेने 2000/- रू केली मदत
राज्यस्तरीय संगीत संमेलनाच्या अध्यक्षपदी सोलापूर सुरमणी मोहम्मद अयाज..
संभाजी ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षपदी प्रविण ठोंबरे यांची निवड
मुलांसह आठवणींचा खजिना तयार करण्यात गुंतले सेलिब्रिटी - हस्तकलेच्या माध्यमातून मुलांच्या क्रिएटिव्हिटीला देत आहेत चालना - शिल्पा शेट्टी, नेहा धूपिया, रणविजय सिंग, करनवीर बोहरा यांचा समावेश
मुंबईचे डॅडी अरूण गवळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धावून आलेले वादळ.. - दत्ता इंद्रमोहन वाकसे जिल्हाध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती बीड
Image