वाढदिवसाचा खर्च टाळून कु.गौरी अनिल लोमटे या विद्यार्थिनीने जय भारती प्रतिष्ठानच्या मोफत जेवण उपक्रमास स्वेच्छेने 2000/- रू केली मदत

*वाढदिवसाचा खर्च टाळून कु.गौरी अनिल लोमटे या विद्यार्थिनीने जय भारती प्रतिष्ठानच्या मोफत जेवण उपक्रमास स्वेच्छेने 2000/- रू केली मदत* .....
 *अंबाजोगाई:* 
अंबाजोगाई येथे संपूर्ण लाॅकडाऊन व संचारबंदी असल्याने सर्व हाॅटेल बंद असल्याने शासकीय व खाजगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या रूग्णांना व रूग्णांच्या नातेवाईकांची  ऊपासमार होऊ नये म्हणून *जय भारती प्रतिष्ठाणने* 
रूग्णांच्या नातेवाईकांना   *मोफत जेवण देण्याचा* निर्णय घेतला. व त्याची सुरूवात दि.27/03/2020 रोजी केली. सुरूवातीला 4 जणांच्या जेवणाचे  डब्बे दिले. याची माहिती सोशल मिडीयातून व वर्तमानपत्रातून  गरजूंना झाल्यानंतर आज दि.07/04/2020 रोजी 
 *दुपारी  एकावेळी 90 जणांच्या जेवणाचे डब्बे दिले.* आज रात्री 95 जणांचे जेवणाचे डबे आहेत.आज 12 वा दिवस *आहे.गेली 12 दिवस अखंडितपणे हा उपक्रम चालू आहे.* 
या *उपक्रमात सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक बांधवांनी स्वेच्छेने अन्नधान्य, व रोख रक्कम असे आर्थिक सहाय्य जय भारती प्रतिष्ठानच्या मोफत जेवण उपक्रमास स्वेच्छेने केले.* 
याची माहिती ई.10 वी परीक्षा दिलेली अंबाजोगाई येथील विद्यार्थ्यांनी  कु *.गौरी अनिल लोमटे* या विद्यार्थिनीस झाल्यानंतर तीने  *स्वतःच्या वाढदिवसाचा खर्च टाळून  जय भारती प्रतिष्ठानच्या मोफत जेवण उपक्रमास स्वेच्छेने 2000/- रू मदत केली* व एक आदर्श समाजापुढे घालून दिला . *गौरी अनिल लोमटे हिने केलेल्या*  *सहकार्याबद्दल जय भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅङ माधव जाधव , संचालक ईंजी.परमेश्वर भिसे, श्यामराव मुळे पाटील,अॅड अमित भैया गिरवलकर  यांनी    तिचे अभिनंदन करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


Popular posts
माणुसकीचा आधारवड!
Image
आरोग्य सेतु अँप व्दारे शासनाने चालु केलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा ----------अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे आवाहन
Image
शेतकरी आत्महत्याग्रस्त व वंचित कुटुंबांना मिळाला आधार ; आधार माणुसकीचा व धागा मैत्रीचा व पेशवा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने
Image
शिधापत्रिका नसलेल्या गोरगरीब कुटुंबाला मोफत राशनचे धान्य वाटप करा- अक्षय भुमकर