"आरोग्यम् धनसपंदा"
--------------------------------
"आरोग्यम् धनसपंदा" या उक्तीचा अनुभव आज तमाम भारतीयच नव्हे तर जगातील लोक घेत आहेत. जे आजारी आहेत त्यांना आरोग्याची किंमत कळतच आहे.पण,जे आजारी नाहीत.त्यांनाही आरोग्याची किंमत कळाली आहे.
---------------------------------
24 मार्च पासून पूर्ण देश .'Lock Down' झाला आहे.प्रत्येकजण स्वताःच्या घरी बंदिस्त आहे.कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे.चिन,इटली पाठोपाठ भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. Stay at home आणि social Distance याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश आपल्या देशाचे पंतप्रधान मा.मोदीजी व राज्याचे मुख्यमंत्री मा.ठाकरे साहेबांनी दिले आहेत.या आदेशाचे पालनही होत आहे. देशातील जनतेला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी खरे तर पोलिस,वैद्यकिय अधिकारी व सफाई कामगार यांच्यावर आहे. यांनी पण,सरकारच्या आदेशाचे पालन केले तर काय होईल ? आपण फक्त सफाई कामगार यांचा विचार करू,यांनी पण Stay at home म्हणुन घरीच थांबले तर काय अवस्था होईल आपल्या शहराची.त्यांनी जर स्वच्छता मोहीम थांबवली तर नक्कीच एखाद्या साथीच्या नविन रोगाची निर्मीती झाल्याशिवाय रहाणार नाही.आपले आरोग्य अबाधित राखण्यासाठी नियमितपणे सफाई कामगार त्यांचे कर्तव्य बजावताना दिसत आहेत.प्रश्न असा आहे की ? त्यांना नाही का कोरोनाची भिती ? त्यांना लागण होणार नाही का ? त्यांच्या कुटुंबाचे काय?
पण,भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत याची जाणीव आज त्यांच्यात दिसत आहे. म्हणुनच आपल्या बंधू भगिनींचे आरोग्य निरामयी रहावे या उद्देशाने ते आशाही परिस्थिती स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांचे कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत.आशा कामगारांसाठी जेवढी कृतज्ञता व्यक्त करू तेवढी कमीच आहे.त्यांच्या कार्याप्रती मी नतमस्तक होऊ इच्छिते.आरोग्याच्या या देवदूतांना सादर प्रणाम..!
-सौ.सविता अनंतराव लोमटे,माजी उपाध्यक्ष नगरपरिषद अंबाजोगाई.