आरोग्य सेतु अँप व्दारे शासनाने चालु केलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा ----------अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे आवाहन


आरोग्य सेतु अँप व्दारे शासनाने चालु केलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा
--------------------------------------
अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे आवाहन
------------------------------------
अंबाजोगाई (प्रतिनिधी)--
कोरोना विरुद्धच्या लढाईत
सामान्य माणसांना सहभागी करुन घेण्यासाठी केंद्र शासनाच्या मानव संसाधन मंत्रालयाच्या वतीने सुरु केलेले आरोग्य सेतु अँप हे प्रत्येकाने डाऊनलोड करुन घ्यावी व कोरोना रोगापासून आपण किती जवळ आहोत हे वैयक्तिक रीत्या जाणून घेवून शासनास सहकार्य करावे असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे आधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.
      केंद्र मानव संसाधन मंत्रालयाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना कोरोना रोगाची माहिती व्हावी यासाठी आणि कोरोना रोगा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाला मदत होणार आहे. हे अँप देशातील विविध १९ भाषांमध्ये हाताळण्याची व्यवस्था करण्यात आली असून आपणास ज्या भाषेत ते हाताळता येईल ती भाषा सलेक्ट करुन हे अँप हाताळता येणार आहे. या अँपवर डाऊनलोड केलेली माहिती ही अतिशय गोपनीय राहणार आहे. या अँफ वर भरण्यात आलेल्या माहिती वरुन कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संबंधितास आवश्यक असल्यास उपचार देण्यासाठी, कोरोना बाधीत रुग्णास विलगीकरण सेवेची सुविधा देण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
    केंद्र शासनाच्या मानव संसाधन मंत्रालय विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेले आरोग्य सेतु अँप सर्व नागरिकांनी त्वरीत आपल्या अँडराँईड मोबाईलवर डाऊनलोड करुन घ्यावे व आपली वैयक्तिक माहिती या अँपवर द्दावी असे आवाहन स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले आहे.