पंचावन्न कुंटूबांना अन्न -धान्यांचे वाटप ; आधार माणूसकीचा स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार
अंबाजोगाई ( प्रतिनिधी) अंबाजोगाई तालुक्यातील उमराई शिवारात पोळपाट , बेलणे, कढई बनविणाऱ्या कारागिरांची होणारी उपासमार पाहून मंगळवारी ( दि. ७ ) आधार माणूसकीचा स्वयंसेवी संस्थेच्या सदस्यांना पंचावन्न कुटूंबांना आठवडाभर पुरेल एवढे धान्य , तांदूळ , गोडतेल बाटली , तिखट, मीठ, बेसन पीठ, दोन साबन प्रत्येकी देण्यात आले .
याप्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी राहूल धस , अॅड . संतोष पवार , अमृत महाजन , नामदेव गुंडाळे , महारूद्र खाडे महाराज , भारत मुळे पाटील , सरपंच भीमराव केंद्रे , उपसरपंच राधाबाई मुळे , ज्ञानोबा केंद्रे , बंडू केंद्रे , अभिजीत हरिभाऊ मुळे ,
धोंडीराम केंद्रे , बालासाहेब फड, एस. के. निर्मळे , रामदास साबळे , गणेश केंद्रे , हनुमंत केंद्रे ,बालाजी केंद्रे , लहू केंद्रे , नागेश औताडे , विठ्ठल केंद्रे , ज्ञानेश्वर नांदवटे , शांतीलाल केंद्रे ,सुजित विडेकर उपस्थित होते .
सामाजिक आंतर ठेऊन रांगेत या गरीब नागरिकांना अन्न - धान्य व भाजीचे वाटप करण्यात आले .
संचारबंदीच्या काळात पोळपाट- बेलणे विक्रेत्यांचे व्यवसाय बंद पडले . त्यामुळे त्यांची कमाई होईना . त्यांची उपासमार होऊ लागली . ते पाहून आधार माणूसकीचा स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख अॅड . संतोष पवार यांनी गरीबांना अन्न -धान्य देण्याची योजना आखली . त्यांनी समाज माध्यमातून गरीबांना धान्य देण्याबाबत नागरिकांनी पुढाकार घेण्याचे अवाहन केले .
अमेरिकेतून दिली मदत : समाज माध्यमावरील अवाहनाला प्रतिसाद देत डोंगर पिंपळा येथील मूळ रहिवासी व नोकरी निमित्त अमेरिकेत गेलेला श्रीकांत अनुरथ सुरवसे यांनी आपण गरीबांना वाटण्यासाठी वीस कीट देण्याचा संकल्प दूरध्वनीवरून व्यक्त केला . संजिवनी देशमुख यांनी साठ मास्क व तांदूळ पाठविला .कर्जतच्या दिपक पाटील यांनी आपला वाढदिवस कार्यक्रम रद्द करून गरीबांना आर्थिक मदत दिली .
जनाई स्टोन क्रशर , माऊली स्टोन क्रशर , संतोष वाघमारे , डॉ . स्वप्नील तट , विनायक माने , अंगद कदम , डॉ .गोपाळ पाटील , गणेश लोखंडे , स्वाती तपकिरे , गणेश चव्हाण , चेतन मोदी , संतोष घोडके , अभिजीत जोंधळे , प्रितम पन्हाळे , प्रा .अभिजीत देशपांडे , प्रा .सविता बुरांडे , योगेश पाटील , किरण राऊमारे , अतुल देशमुख , ज्ञानेश पाटील , राजाभाऊ पवार , भोसले , विक्रम पाटील , धनराज पवार , काळे , आसरडोहकर, रमेश काकडे ,
रामदासी , उत्तम खाडे , धोंडीराम केंद्रे यांनी सहकार्य केले .
पंचावन्न कुंटूबांना अन्न -धान्यांचे वाटप ; आधार माणूसकीचा स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार