अंबाजोगाई च्या तरुण अभियंत्यांनी बनवलेल्या सँनिटायझर रुमचे पोलीस स्टेशनमध्ये लोकार्पण...


 


इंजि.प्रदीप लहुदास जाधव
इंजि. रविंद्र उत्तमराव राठोड
सौजन्य: नवजीवन मशनरी स्टोअर्स..


अंबाजोगाई च्या तरुण अभियंत्यांनी बनवलेल्या सँनिटायझर रुमचे पोलीस स्टेशनमध्ये लोकार्पण...
----------------------------------


अंबाजोगाई येथील तरुण अभियंते प्रदीप लहुदास जाधव आणि रविंद्र उत्तमराव राठोड या दोन तरुण अभियंत्यांनी सँनिटायझर रुम तयार केली असून या रुमचे लोकार्पण अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनला आ. संजयभाऊ दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार,न.प. सदस्य बबन लोमटे, मिलिंद बाबजे, पोउनि दहिफळे, पोउनि सोडगिर, पोउनि सुर्यवंशी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थित लोकार्पण करण्यात आले आहे.
     अंबाजोगाई येथील टी.बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे हे दोन्ही अभियंता विद्यार्थी असून प्रदीप लहुदास जाधव याने इलेक्ट्रॉनिक तर रविंद्र उत्तमराव राठोड याने मँकेनिकल विषयात बी.ई. ची पदवी घेतली आहे.
   मागील काही दिवसात सोशल मेडियावर मेट्रोपोलिटन शहरात सँनिटायझर रुम बसवल्याची दाखवण्यात आल्यानंतर या दोघांनी प्रेरणा घेवून ही सँनिटायझर रुम बनवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. या दोघांना या रुमसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य नवजीवन मशनरी स्टोअर्स चे संचालक धनराज सोळंकी यांनी पुरवले.
    सदरील सँनिटायझर रुम बसवण्यासाठी स्वप्नील परदेशीव त्यांचे सहकारी, पोहेकाँ अभिमान भालेराव, पोकाँ चाटे व इतर पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.
     सँनिटायझर रुम चे लोकार्पण करण्यापुर्वी इंजि. प्रदीप जाधव याने या रुमच्या निर्मिती आणि वापराबद्दलची तांत्रिक माहिती दिली. या रुममध्ये अँटोमँटीक सेंसार बसवण्यात आले असून रुम मध्ये व्यक्ती गेली की हे सेंसार सँनिटायझरची प्रक्रिया सुरु करतील, ठराविक सेकंदानंतर ही प्रक्रिया अळटोमँटीक बंद होईल असे त्याने सांगितले. 
अशाच प्रकारची सँनिटायझर रुम लवकरच रोटरी क्लब च्या सहकार्याने स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात बसवण्यात येणार असल्याची माहिती ही प्रदीप जाधव याने दिली.
    यावेळी आ. संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे व इतर मान्यवरांनी प्रदीप राठोड व रविंद्र जाधव यांनी पुढाकार घेवून ही सँनिटायझर रुम तयार केली याबद्दल त्यांचे कौतुक केले .


Popular posts
माणुसकीचा आधारवड!
Image
वाढदिवसाचा खर्च टाळून कु.गौरी अनिल लोमटे या विद्यार्थिनीने जय भारती प्रतिष्ठानच्या मोफत जेवण उपक्रमास स्वेच्छेने 2000/- रू केली मदत
आरोग्य सेतु अँप व्दारे शासनाने चालु केलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा ----------अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे आवाहन
Image
शेतकरी आत्महत्याग्रस्त व वंचित कुटुंबांना मिळाला आधार ; आधार माणुसकीचा व धागा मैत्रीचा व पेशवा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने
Image
शिधापत्रिका नसलेल्या गोरगरीब कुटुंबाला मोफत राशनचे धान्य वाटप करा- अक्षय भुमकर