शिधापत्रिका नसलेल्या गोरगरीब कुटुंबाला मोफत राशनचे धान्य वाटप करा- अक्षय भुमकर

शिधापत्रिका नसलेल्या गोरगरीब कुटुंबाला मोफत राशनचे धान्य वाटप करा- अक्षय भुमकर
—————————————-
अंबाजोगाई (प्रतिनिधी )- देशासह राज्यांत लाॅकडाऊन च्या काळात हातावर पोट असलेल्या अनेक गोरगरीब मजुर कामगार लोक जांच्याकडे शिधापत्रिका नाही  व ज्यांना शिधापत्रिका असुन हि राशनचे धान्य मिळत नाही अकशी लोकांची उपासमारी होत असुन अशा  लोकांना स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य वाटप करा अशा मागणिचे निवेदन युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी तहसीलदार यांना दिले आहे.


ज्या गरजु गरीब लोकांकडे शिधापत्रिका असुनही राशन त्यांना मिळत नाही यांना लाॅकडाऊन च्या काळात आपन आपल्याकडून काही उपाययोजना कराव्यात जेणे करून गोरगरीब जनता लाॅकडाऊन च्या काळात पैशा अभावी अन्न धान्य विकत घेऊ शकत नाही असे लोक उपासमारीने जगु नये या साठी शासनाने गोरगरीब कुटूंबासाठी लागु केलेल्या मोफत धान्य योजने अंतर्गत  आपन आपल्या कडुन काही तरी उपाययोजना राबवाव्या व ज्यांना शिधापत्रिका असुन ही धान्य मिळत नाही व ज्यांच्या कडे शिधापत्रिका नाहीत अशा गोरगरीब कुटुंबाला  मोफत धान्य देऊन लोकांना हातवार लावून लाॅकडाऊन च्या काळात कोनावरही निष्पाप भेद भान न करता
उपासमारीची वेळ आणु नये. अशी मागणी युवासेना केज-अंबाजोगाई विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे..!