जेव्हा बघावं तेव्हा मोबाईल हातातच. असे उद्गार प्रत्येकाच्या तोंडातच पण, म्हणणारा म्हणतो ऐकणारा एकाकानाने ऐकून दुसर्या कानाने सोडून देतो. का ही अशी परिस्थिती कशासाठी? अधोगतीकडे जाण्यासाठी?काय करतात सर्वजण मोबाईलवर. हे कळतं पण वळत नाही. कारण प्रत्येकाच्या ताटात माश्या आहेत जरस्वतःच्या ताटात पडलेली माशी न पाहता दुसर्याच्या ताटातील माशी पाहून ती काढायला सांगितली तरसमोरचा लगेच उत्तर देणार स्वतःच्या ताटातील काढ अगोदर. प्रत्येकालाच मोबाईलची एवढी ओढ का?कशासाठी? जीवनात मिळालेला अनमोल वेळ वाया घालवण्यासाठी? जो की एकदा गेला तर कितीहीजीवाचा आकांत केला तरी परत न येणारा. आजच्या परिस्थितीत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एकच अॅपटिक टॉक. काय असतो या टिक टॉक व्हिडिओमध्ये. फक्त स्वतःच्या शरीराची विटंबना. फक्तमनोरंजनासाठी. त्यामध्ये काय चांगल आहे, काय वाईट? जीवनात त्याचा उपयोग आहे की नाही, याचाविचार नसतोच मुळी. खरं सांगायचं झालं तर हा होपलेस आणि जॅबलेस व्यक्तींसाठी बनवण्यात आलाअॅप आहे जेणेकरून अशी व्यक्ती यातून काही पैसे कमावतील, कोणाला नवीन कल्पना आल्या तर तेयाद्वारे सर्वांसमोर मांडतील कारण जे होपलेस आहेत, असतात त्यांचे सतत काहीतरी विचार चक्र सुरूचअसते त्यातून ते काही नवीन घडवून आणतील व त्यांच्या त्या विचारातून काहीतरी नवीन कल्पनाजगासमोर येतील. हा या मागचा हेतू. पण, असं झाले की, सर्वजण आपली लाज, मान, मर्यादा, प्रतिष्ठासोडून मनाला वाटेल तसे व्हिडिओ बनवत आहेत आणि ते टिकटॉकवर अपलोड करतात. त्यानंतर काहीकमेंट्स आल्या, कोणी कितीही गलीछ्च बोलले, कोणी कितीही नापसंती दिली तर काही घेणे देणे नाही.फक्त व्हिडिओ बनवायचा एवढेच ठरलेलं. ते व्हिडिओ बनवतात व पाहणारे दिवसाची रात्र आणि रात्रीचादिवस करून बघण्यात घालवतात. जसा वेळ यांच्या म्हणण्याप्रमाणे थांबतो आणि सुरू होतो. या टिक टॉकअॅप वर कोणाचे जास्त व्हिडिओ असतील तर ते मुलींचे. चांगल्या सुशिक्षित सुंदर मुली या व्हिडिओबनवण्यासाठी वेड्या झाल्या आहेत. एक व्हिडिओ बनवला की दुसर्याची तयारीच. त्यांची ही मूलभूत गरजझाली आहे असे वाटते. व्हिडिओ बनवा. नाही म्हणत नाही. पण काहीतरी जीवनावश्यक गोष्टीचा, काहीतरीनवीन शिकण्यास मिळणारा, काहीतरी स्फूर्ती मिळणारा, पण नाही फक्त आणि फक्त यांना एकच व्हिडिओबनवता येतो आपले शरीर आठ नऊ ठिकाणी वाकडे करण्याचा आणि आपली इज्जत चव्हाट्यावरआणण्याचा. बरंच काही आहे अशा व्हिडिओ बद्दल सांगण्यासारखे पण थोडक्यात सांगितलेले सर्वांच्यालक्षात येईल असे समजते. तसेच अनेक व्हिडीओ आहेत स्वतःच्या शरीराची विकृती म्हणून लोकांच्यापाहण्यासाठी पुढे येतात. मग त्या विकृती साठी कोणत्याही प्रकारची हद्दपार केलेली असते. कोणताही विचारन करता आणि पाहणारे लोक तेच रात्रंदिवस पहात बसतात. पण याच संधीचा उपयोग करून व्हिडिओबनवणार्या लोकांनी जर समाजाला काही नवीन संदेश देणारे, विविध टेक्नॉलॉजीची माहिती देणारे, विविधविषयांवरील अभ्यासाच्या सोप्या पद्धतीची माहिती देणारे, गरजूंना मदत करणारे, माणुसकीच खरे दर्शनघडवणारे विचार जर या व्हिडीओ मधून लोकांना दिले, तर तुमचाही टाइम फुकटचा गेला आणिपाहणार्याचाही टाईम उगीच गेला असेही वाटणार नाही. असे काही व्हिडिओ पण आहेत जे समाजालाचांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांचे स्वागतकरते. पण बाकीच्यांचं काय? या टिक टॉक वरील व्हिडीओ मध्ये एक तर महिला व मुलींचा सहभाग जास्तआहे आणि तोही समाजावर वाईट परिणाम करणारा. काही एक-दोन व्हिडीओ सोडले तर बाकीच्यांचा विषयफक्त एकच. अंग प्रदर्शन करायचे, काहीतरी अश्लिल भाष्य करायचे. जे लोक टक लावून पाहतात. असेव्हिडिओ बनवणारे एक पट वेडे आणि पाहणारे दहापट वेडे. एवढेच काय तर मन लावून पाहतात आणिलाइक्स पण देतात आणि कमेंट पण. मग ती चांगली असेल किंवा वाईट, याच्याशी काही घेणे देणे नाही. यासर्व परिस्थितीचा प्रत्येकाच्या रियल लाईफ वर किती परिणाम होत आहे हे मात्र कोणाच्याच डोक्यात येणारनाही. मोठे तर सोडाच पण लहान मुले सुद्धा मनोरंजन म्हणून हे सर्व पहात बसतात व त्यांच्या जीवनातीलअनमोल वेळ वाया घालतात. आता मुलांना कसं सांगायचं कारण स्वतःच्या ताटात माशी पडल्यावरदुसर्यांच्या ताटातील सांगून उपयोग तरी काय आणि ऐकणार तरी कोण? पती-पत्नीमध्ये यासाठी भांडणेसतत. खरं सांगायचं झालं तर प्रत्येकाला टिक टॉक पाहण्याचे व्यसन जडले आहे, जोपर्यंत व्हिडिओ पहातनाहीत तोपर्यंत तळमळ सुरूच असते. सांगायचं असं की, कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका म्हणजेच हेव्यसन लावून घेणे किंवा नाही हे तुमच्या हातात आहे जर तुम्ही असे व्हिडीओ पाहिले नाहीत, लाईक केलेनाही तर असे व्हिडिओ कोणी बनणारच नाही. जो वेळ तुम्ही हे व्हिडिओ पाहत घालवतात तोच वेळ तुमच्यापरिवारासाठी द्या. जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांसोबत घालवा, त्यांच्या बालपणात सामावून जा.तुम्हीपण तुमचं बालपण अनुभवा. तरच तुम्हाला समाधान मिळेल. व चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यासाठीपरिपूर्ण असतील. तेव्हा सोडा हा खुळा नाद आणि जगा आपल्या प्रेमाच्या व्यक्तीसाठी निरोगी आणि हेल्दी आयुष्य.
- Smt. Swati Chavan, Ambajogai