पुन्हा एकदा बीजीएस टीम धावली रुग्णाच्या मदतीला
रुग्णालयात प्लेटलेट्स आवश्यक असल्याबाबत ब्लड बँकेचे प्रभारी अधिकारी डॉक्टर विनय नालपे यांनी बीजेएस आज सकाळी 9.15 वाजता लक्षात आणुन दिले . आमच्याकडे रक्तदात्यांची यादी असल्यामुळे मराठवाडाचे उपाध्यक्ष धनराज भैया सोळंकी यांनी तात्काळ संपर्क करून रक्तदात्यांना रक्तदान करण्याची विनंती केली .रक्तदातास आपल्याकडे प्लेटलेट्सची कमी उपलब्धता लक्षात आली व त्यांनी रकतदान करुन एखादयाचे जिवनाचे हे हिरो झाले .प्रवीण चोकडा, भीमाशंकर शिंदे, महेंद्र निकाळजे, युवक मित्र आदित्य सज्जन जगताप, विश्वजीत भारत हंडीबाग, विश्वनाथ ज्योतीराम परळकर यांनी स्वतःहून येऊन रक्तदान केले. गरजू रुग्णाची प्लेटलेट्स ची गरज पूर्ण केली या मधे सज्जन गाठाल यांनी ब्लड बँकेत स्वःताच गाडीत घेवून गेले.सामाजिक कार्य करताना तरुणांनी पुढाकार घेतल्यास निश्चितच गरजुंना योग्य मदत मिळू शकते