अंबाजोगाई (प्रतिनिधी)— कोरोना या विषाणुने संपुर्ण देशातील व राज्यातील प्रशासनाला नागरिकांना व हैदोस करून सोडले असुन प्रत्येक व्यक्तीच्या जिवाशी हा कोरोना रोग खेळत असुन अशा परस्थीतित आपन आपली स्वत:ची परिवाराची व सभोवतालच्या नागरिकांची काळजी म्हणुन सरकारने जाहिर केलेल्या लाॅकडाऊनचे पुर्णपणे पालन करून घरीच सुखात बसुन राहणे हाच कोरोना ला हद्दपार करण्याचा एकमेव सर्वात मोठा उपाय असल्याने आपन सर्वांनी घरीच राहुन सरकारला सहकार्य करून कोरोना आपल्या पासुन दुर करता येई असे मत युवासेना विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी व्यक्त केले आहे.
दिवसेंदिवस रूग्णांचे संख्या वाढत जरा असली तरी सुदैवाने बरे रूग्णहोण्याची हि संख्या चांगल्या प्रमाणात असल्याने ते आपल्या सर्वांसाठी चांगले संकेत मिळत आहेत. दिवस रात्र राज्यसरकार मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे, आरोग्यमंत्री राजेशजी टोपे, सर्व पोलिस अधिकारी, डाॅक्टर्स,शासकीय कर्मचारी सामाजिक संस्था हे या कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी शतार्थी प्रयत्न करत असताना. आपन आपल्या कुटुंबाचाभाग आजुबाजुच्या परिसरातील जनतेचा अविराज भाग जबाबदार नागरिक समज़ुन सर्व निर्बंधाचे कडे कोठ पालन करून मदत करावी आपन स्वत: काळजी घेतली तर स्वत:सह कुटुंब परिसरातील नागरिक या कोरोनाच्या प्रादुर्भावापासुन दुर राहु शकतील या साठी आपन कृपया विनंती करून गर्दी वरदळीच्या ठीकाणी घराबाहेर पडु नकात जमाव करून बसु नका अत्यावश्यक सेवेची गरज पडल्यासच आपल्याला दिलेल्या वेळेत घराबाहेर पडा. जमावबंदी संचारबंदीचा नियम कायदा मोडीत काढु नका हे सर्व आपल्या स्वत:च्या जिवाच्या हितासाठीच आहे. सतत साबनाने हात धुवावे, चेहर्याला मास्क, रूमालचा वापर करा व प्रशासन पोलिस यंत्रना सरकारी कर्मचारी डाॅक्टर्स यांना सहकार्य करा अनपेक्षीत प्रकार कुठे घडून आणु नका. सुदैवाने आपल्या बीड जिल्ह्यात कोरोना चा एक हि रूग्ण अद्याप नाही तेंव्हा स्वत: सुरक्षीत रहा कुटुंबाला व परिसरातील सर्व नागरिकांना सुरक्षीत ठेवा कोरोनाला आपल्यापासून हद्दपार करण्यासाठी घरीच सुरक्षीत बसा आनंदी रहा असे मत युवासेना केज-अंबाजोगाई विधानसभा चिटणीस अक्षय भुमकर यांनी व्यक्त केले आहे.