खुळ्यांचा बाजार.....
चीन या देशात कोविड -१९ या रोगाने थैमान घातलं व बघता बघता या रोगाने संपूर्ण जगात हात पाय पसरले.
भारतात देखील बऱ्याच प्रमाणात या रोगाने वाव घेतला. तरीही अद्याप पर्यंत अनेक लोकांनी याला गांभीर्याने घेतलं नाही.
या रोगाचा देशातील विचार केला तर सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत व महाराष्ट्रात या रोगाचा मृत्युदर देखील जास्त आसल्याच दिसून येत. तर गोव्यात हाच मृत्युदर ० असल्याचं दिसत.
संपूर्ण देशात २२ मार्च २०२० रोजी लॉकडाऊन् करण्यात आलं. त्याच बरोबर मा. पंतप्रधानांनी जनतेला आवाहन केलं की, संध्याकाळी ५ वाजता ५ मिनिटांसाठी आपण आपल्या टेरेस वरती, बाल्कनीत किंवा घराच्या दरवाज्यात उभे राहून टाळ्या किंवा थाळ्या वाजवा. हे यासाठी की, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जसे की, पोलिस, नर्स, डॉक्टर ई. कर्मचाऱ्याचे आभार मानण्यासाठी आणि या आवाहनाला प्रंचड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण काही लोकांनी मूर्खपणाचा कळस गाठला. लोकांना आपल्या घरात उभे राहून वाजवण्यासाठी सांगितले तर अनेक लोक एकत्र जमले व टाळ्या थाळ्या वाजवू लागले. अनेक ठिकाणी लोक मिरवणुका काढल्यासारखे एकत्र पाहायला मिळाले. हे योग्य आहे का ? आपल्याला आवाहन काय करण्यात आल व आपण करतो काय.
त्याच बरोबर मा. पंतप्रधानांनी ५ एप्रिल २०२० रोजी रात्री ९ वाजता फक्त ९ मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करून सर्वांनी दिवे, मेणबत्ती लावावे असे आवाहन केले. यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. उभा भारत देश यावेळी दिव्यांनी उजळुन निघाला. पण याही वेळेस लोकांनी कहरच केला. बातम्या मध्ये सोशल मीडिया वर आपण पहिलं असेल की अनेक लोक हातात मेणबत्ती, दिवा, मशाली घेवून एकत्र जमले व मिरवणूक काडल्यासारखे रस्त्याने फिरताना दिसले. अनेक ठिकाणी फटाके फोडल्याचे प्रकार घडले. यामुळे अनेक ठिकाणी आगी लागल्याचे उदाहरण आपणं बातम्या मध्ये पाहिले आहेच. एकत्र येऊन असे केल्याने हा आपण जिंकलो असे नाही. आपणास मा. पंतप्रधानांनी घरात राहून दिवे, मेणबत्ती लावण्यासाठी सांगितले होते. एकत्र जमण्यास नव्हे. आपणास पंतप्रधान सांगतात काय व आपण करतो काय याचा विचार करण गरजेचे आहे. अनेकजण विनाकारण घरातून बाहेर पडत आहेत. पोलिस बांधव देखील जनतेला अनेक वेळेस वेगवेगळ्या शैलीतून विनवणी करत आहेत विनाकारण घराबाहेर पडू नका.
अनेक लोक त्यास गांभीर्याने घेत नाहीत. आज आपले पंतप्रधान अनेक उपाययोजना करून कोरोना वाढू नये यासाठी खबरदारी घेताना दिसून येतात. त्यामुळे आपलं ही कर्तव्य आहे खबरदारी घेणं, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणं.
शेवटी एवढच सांगावस वाटत की आपल्याला सांगितलं जात काय व आपण करतो काय याचा विचार करावा, एकत्र येवू नये व विनाकारण घराच्या बाहेर पडून स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात आणू नये. शासनास योग्य ते सहकार्य करावे.
- Article By : Vishal Kamble, Latur 9096942436