कोरोनाच्या कठीण दिवसांत अंबाजोगाई नगरपरिषदेची दिव्यांग व्यक्तींना आर्थिक मदत
अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई नगरपालिकेने दिव्यांग कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून कोरोना साथजन्य आजाराच्या कठीण दिवसांत शहरातील तब्बल 501 दिव्यांग बांधवांना दिलासा देत त्यांचे खात्यावर ऑनलाईन 10 लक्ष 2 हजार रूपयांचे अर्थसहाय्य जमा करून मदतीचा हात दिला आहे. अंबाजोगाई शहरातील दिव्यांग व्यक्तींना आर्थिक सहाय्य दिले जाते.तसेच स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन केले जाते.त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण आणि दिव्यांग विद्यार्थी यांना प्रोत्साहन मिळावे या भूमिकेतून अंबाजोगाई नगर परिषद कार्य करीत आहे. अंबाजोगाई नगरपालिकेने दिव्यांग कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून कोरोना साथजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील तब्बल 501 दिव्यांग बांधवांना अशा कठीण काळात दिलासा देत त्यांचे बँक खात्यावर प्रत्येकी 2 हजार रूपये या प्रमाणे सुमारे 10 लक्ष 2 हजार रूपयांचे अर्थसहाय्य मंजूर करून ते ऑनलाईन जमा केले आहे अशी माहिती नगराध्यक्षा सौ.रचना सुरेशराव मोदी, उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,गटनेते राजकिशोर मोदी,मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप यांनी दिली आहे.

 

दिव्यांग बांधवांना कल्याणकारी योजनेतून सहकार्य

=========================

"दिव्यांगांना दिव्यांगत्व हे शाप न वाटता ते वरदान वाटले पाहिजे अशा प्रकारची कामगिरी करण्यासाठी अंबाजोगाई नगरपालिका कटिबद्ध आहे.दिव्यांग बांधवांना कल्याणकारी योजनेतून सहकार्य करण्याचे काम नगरपरिषद करीत आहे. पुढील काळात दिव्यांग बांधवांसाठी खुप काही करण्याची ईच्छा आहे.त्यामुळे शहरातील सर्व 

दिव्यांग बांधवांनी आपली निराशा झटकून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व "मुकम् करोति वाचालम्,पंगूम् लघयते गिरीम्" ही म्हण प्रत्यक्षात आणून दाखवावी."

-राजकिशोर मोदी (गटनेते,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.)

----------------------------------------------------------------------------------------

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालमत्ता कर दंडात कपात ; अंबाजोगाई नगरपरिषदेचा निर्णय   

 

लॉकडाऊन नंतर मिटींगमध्ये घेणार ठराव

=========================

अंबाजोगाई (प्रतिनिधी) 

अंबाजोगाई मधील कर थकबाकीदारांच्या मालमत्ता कर दंडात कपात करण्याचा निर्णय अंबाजोगाई नगरपरिषदेने घेतला असून लॉकडाऊन नंतर मिटींग मध्ये याबाबतचा ठराव घेणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी, उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते राजकिशोर मोदी, भाजपाच्या गटनेत्या सौ.संगीता दिलीपराव काळे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सौ.राजश्री अशोक मोदी, मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय हा मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देणारा असून मालमत्ता कर थकबाकीदारांवर केली जाणारी शास्ती (दंड) यात नगरपरिषदेने कपात केली आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भांव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक अधिनियम 1897 च्या अंमलबजावणीस १३ मार्च पासून सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे राज्या प्रमाणेच अंबाजोगाई शहरातील जनजीवन हे पुर्णत: विस्कळीत झाले आहे.याचा सर्वात मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे.या साथ आजाराने अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अंबाजोगाईतील व्यावसायिक आणि हातावर  पोट करणार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.या पार्श्वभूमीवर कर थकबाकीदारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत नगरपरिषदेने त्यांना लागू केलेली शास्ती (दंड) यात कपात केली आहे. अशी माहिती नगराध्यक्षा सौ.रचनाताई मोदी, उपनगराध्यक्ष बबनराव लोमटे,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते राजकिशोर मोदी,भाजपाच्या गटनेत्या सौ.संगीता दिलीपराव काळे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या सौ.राजश्री अशोक मोदी, मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप आदींनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

 

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा सहानुभूतीपुर्वक विचार

=========================

दरवर्षी 31मार्चला करदाते हे त्यांचे कडील करांचा भरणा नियमीतपणे करतात.यावर्षी माञ कोरोना विषाणु साथ आजाराच्या पार्श्वभूमीवर 

असलेले लॉक डाऊन, संचारबंदी तसेच स्वतःचे उद्योग आणि व्यवसाय बंद असल्याने आर्थिक व्यवहार ठप्प आहेत.त्यामुळे सर्वसामान्य करदाते, अंबाजोगाईकर यांना 31 मार्च पर्यंत कर भरणा करता आलेला नाही.तसेच अंबाजोगाई नगरपरिषदेचे संपुर्ण प्रशासन हे कोरोना साथ रोगाच्या प्रतिबंधासाठी नियमीत स्वच्छता व औषध फवारणी आदी विविध उपाययोजना राबविण्यात व्यस्त आहे.या सद्य परिस्थितीची जाणीव नगरपरिषद प्रशासनास आहे.त्यामुळे अंबाजोगाई नगरपरिषदेने मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा दिला असून मालमत्ता कर थकबाकीदारांवर केली जाणारी शास्ती (दंड) यात नगरपरिषदेने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

-सौ.रचना सुरेश मोदी (नगराध्यक्षा,न.प.,अंबाजोगाई.)

 

--------------------------------------------------

 

कर थकबाकीदारांना दिलासा देणारा निर्णय

========================

संपूर्ण जगात करोना विषाणूमुळे उदभवलेली परिस्थिती अत्यंत भयानक आहे.तसेच राज्यात संचारबंदी लागु असल्याने, अनेक नागरिकांचे रोजगाराचे साधन बंद झाले आहे.अशा परिस्थितीत कर थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी अंबाजोगाई नगरपरिषदेने दंडात कपात 

करण्याचा निर्णय घेतला आहे.लॉकडाऊन नंतर मिटींग मध्ये याबाबतचा ठराव घेणार आहोत.

–डॉ.सुधाकर जगताप,(मुख्याधिकारी,न.प.,अंबाजोगाई.)

Popular posts
माणुसकीचा आधारवड!
Image
वाढदिवसाचा खर्च टाळून कु.गौरी अनिल लोमटे या विद्यार्थिनीने जय भारती प्रतिष्ठानच्या मोफत जेवण उपक्रमास स्वेच्छेने 2000/- रू केली मदत
आरोग्य सेतु अँप व्दारे शासनाने चालु केलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा ----------अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे आवाहन
Image
शेतकरी आत्महत्याग्रस्त व वंचित कुटुंबांना मिळाला आधार ; आधार माणुसकीचा व धागा मैत्रीचा व पेशवा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने
Image
शिधापत्रिका नसलेल्या गोरगरीब कुटुंबाला मोफत राशनचे धान्य वाटप करा- अक्षय भुमकर