अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुरेश कराड यांच्याकडून गुरूवार,दिनांक 2 एप्रिल रोजी 51 गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. अंबाजोगाई नगरपरिषदेचे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुरेश कराड,सौ.जयश्री सुरेशराव कराड,संदेश कराड,संकेत कराड,तुषार कराड,मनोज कराड यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी गरजूंना गहू, तांदूळ,दाळ,खाद्यतेल,कपडे धुण्याचा साबण,भाजीपाला असे १५ दिवस पुरेल एवढे किराणा साहित्य वाटप करण्यात आले आहे.तसेच आणखी गरजूंची यादी करून असे साहित्य वाटप केले जाणार असल्याची माहिती नगरसेवक कराड यांनी यावेळी देवून त्यांनी शहरातील जनतेने शासनाने दिलेल्या सूचनेचे तंतोतंत पालन करावे.शहरामध्ये नवीन आलेल्या लोकांची माहिती प्रशासनाला तात्काळ द्यावी.अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच कुटुंबातील एकानेच दिलेल्या वेळेत बाहेर येऊन आपले काम झाले.की, लगेच घरी जावे असेही नगरसेवक सुरेशराव कराड यांनी आवाहन केले आहे. नगरसेवक कराड हे सामाजिक कार्यांत सातत्याने पुढाकार घेतात.
भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक सुरेशराव कराड हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होतात.कोरोना साथ आजाराच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्याचे कार्य करून कराड यांनी शहरवासियांसमोर चांगला आदर्श ठेवला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
रोखण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेल्या 'लॉकडाऊन' मुळे हातावर पोट असलेल्या मजूर, रोजंदारी करणा-या कामगारांचे हाल होत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा कुटुंबांना कराड कुटुंबियांनी मदतीचा हात दिला आहे. कराड यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वञ स्वागत होत आहे.शहरातील हातावर पोट असणा-या, मोलमजुरी करणा-या ज्यात नाभिक,सफाई कामगार, घरकाम करणा-या महिला भगिनी व गरजूंना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप 'सोशल डिस्टन्स' पाळून करण्यात आले आहे.यावेळी ज्येष्ठ पत्रकार अ.र.पटेल,पञकार रमाकांत उडाणशिव, परमेश्वर गित्ते,रणजित डांगे,नागेश औताडे,गौरव कुलकर्णी,सतिश बलुतकर यांची उपस्थिती होती.
नगरसेवक सुरेशराव कराड यांच्याकडून गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप