शेतकरी आत्महत्याग्रस्त व वंचित कुटुंबांना मिळाला आधार ; आधार माणुसकीचा व धागा मैत्रीचा व पेशवा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने


शेतकरी आत्महत्याग्रस्त व वंचित कुटुंबांना मिळाला आधार
…......................................
आधार माणुसकीचा व धागा मैत्रीचा व पेशवा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने
........................................
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.यातच रोजंदारीवर काम करून उपजीविका भागवनाऱ्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये ह्या भावनेतून अंबाजोगाई  येथिल संत गाडगेबाबा सेवा भावी संस्था अंतर्गत आधार माणुसकीचा  व धागा मैत्रीचा या उपक्रमांद्वारे  अॅड. संतोष पवार व अमृत महाजन मित्र परिवार व पेशवा युवा व महिला मंच यांनी  ज्यांना शक्य आहे अश्याना मदतीचे आवाहन केले.त्यानंतर त्यांच्या हाकेला दाद देत समाजातून दानत असलेले देश-विदेशातिल भारतीय नागरिक पुढे आले आणि सढळ हाताने त्यांच्या परीने मदत करीत आहेत. संचारबंदी लागू झाल्यापासून आजतागायत  प्रत्येक गरजू कुटुंबाच्या घरी जाऊन प्रत्यक्ष मदत करण्याचे काम सुरु आहे.
         अंबाजोगाई,परळी, केज,धारूर,लातुर ग्रामीण या भागातील शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबाच्या समोरील संकट लक्षात घेऊन 40 गावातील 150 कुटुंबाना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना अन्न-धान्याची किट देऊन त्यांच्या समोरील अडचणी समजून घेत त्यांना मानसिक पाठबळ देण्यात देऊन  या कुटुंबाना धीर देण्यात   आला .
        तसेच पालावर राहणारे/कॅन्सरग्रस्त/एच आय व्ही बाधीत व निराधार अश्या जवळ्पास 300 कुटुंबाना अन्न-धान्याची किट देऊन माणुसकीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न सुरु आहे.
…................................
1500 कुटुंबाना भाजीपाला वाटप
....................................
        औरगंपूर/लाडेगांव/अकोला/ गित्ता येथील   पारेकर-धिरे-आगळे- इरलापल्ले या शेतकरी बांधवांनी गरजू  कुटुंबाना वाटप करण्यासाठी स्वतःच्या शेतातील टोमॅटो/शेवग्याच्या शेंगा/पत्ता-कोबी  मोफत उपलब्ध करून दिला , उपलब्ध भाजी पाला वडारवाडा, पंचशील नगर, क्रांती नगर, पालावर राहणारे,जोगाईवाडी,वाघाळा-आंबासाखर, हौसिंग सोसायटी झोडपट्टी, गवळी पुरा, परळीवेस,पोलीस वसाहत, पठाण मांडवा, काळवीट तांडा, शिवाचा तांडा या परिसरात राहणाऱ्या गरजू कुटुंबाना वाटप करण्यात आला.
        अनेक दानशूर व्यक्तीनि सहकार्य केल्याने आजपर्यंत जवळ पास 400 कुटुंबाला सहकार्य केल्याचे अॅड.संतोष पवार व अमृत महाजन यांनी सांगितले, तसेच या पुढेही लॉक डाऊन संपेपर्यंत अनेक गरजू कुटुंबाना सहकार्य करण्यासाठी समाज माध्यमातून  दानशूर नागरिकांनी पुढाकार घेऊन सहकार्य करण्याचे अवाहन आधार माणुसकीचा-धागा मैत्रीचा व पेशवा युवा व महिला संघटन यांच्या वतीने करण्यात येत आहे.
……....................................मिडिया व सोशल मिडिया यांचे सहकार्य.
.....................................


कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता देशभर लॉकडाऊन हा पर्याय समोर आला असतांना, हातावर पोट असणा-यांसमोर भाकरीचे संकट उभे राहिले.
या भयावह परिस्थितीची कल्पना देणारी व मदतीचे आवाहन करणारी पोस्ट आधार माणुसकीचा यांच्या वतीने करण्यात आली. 
त्यास मिळालेला प्रतिसाद विविध माध्यमातून वेळोवेळी बातम्यांच्या रूपाने प्रकाशित झाला. याचाही सकारात्मक परिणाम झाला व अनेक हात मदतीसाठी सरसावले आहेत.


Popular posts
माणुसकीचा आधारवड!
Image
वाढदिवसाचा खर्च टाळून कु.गौरी अनिल लोमटे या विद्यार्थिनीने जय भारती प्रतिष्ठानच्या मोफत जेवण उपक्रमास स्वेच्छेने 2000/- रू केली मदत
आरोग्य सेतु अँप व्दारे शासनाने चालु केलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा ----------अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे आवाहन
Image
शिधापत्रिका नसलेल्या गोरगरीब कुटुंबाला मोफत राशनचे धान्य वाटप करा- अक्षय भुमकर