चीनचा विषाणू
चीन चा विषाणू

============== 

 

चीन चे विषाणू आता 

माणसांचे जीव घेऊ लागले 

त्यामुळेच तर जग आता 

Lockdown होऊ लागले 

 

कोरोना विषाणू मात्र 

समानतेने वागतोय 

गरीबांसारखेच तो 

श्रीमंतांकडे जगतोय 

 

विषाणूच्या या संसर्गामुळे

जगावर कारुण्य आले 

मानवाच्या संकट काळात 

डॉक्टर मात्र देवदूत झाले 

 

"खेड्याकडे चला"  हा नारा 

सारे लोक देऊ लागले 

अबोल असणारे नाते मात्र 

एकत्रित राहू लागले 

 

वाहतुकीचे नियम सारे 

माणसांनाही आले 

म्हणूनच माणसांचे अंतर 

सुरक्षित झाले 

 

विषाणूंची आपणाला 

घालवायची असेल साथ 

तासातासाला आपल्याला

धुवावे लागतील हात 

 

प्रा. जिजाराम कावळे.

खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई.