आणखीही वेळ गेलेली नाही.. (अंतर्मनाचा कप्पा - भाग 16)

आणखीही वेळ गेलेली नाही...


----------------------------------------
© दत्तात्रय काळे (परळी वैजनाथ)
संपर्क - 9607072505 - अंतर्मनाचा कप्पा - भाग 16
----------------------------------------


माणूस हा इथून तिथून एकच असतो. आजाराला जात, धर्म, पंथ, प्रदेश, अर्थ अशा कोणत्याही गोष्टीची सीमा नसते. संपूर्ण जग दहशतीखाली आहे. देशाचं आणि राज्यच शासन पोटतिडकीने घरात बसा म्हणून सांगतंय. अगदी बेंबीच्या देठापासून जरी सांगितलं तरी ऐकायला कोणीही तयार नाही. जिभेचे चोचले आजच्या ऐवजी उद्या पुरवता येतील, संकट टळून गेल्यावर खूप काही करता येईल. पण आज गर्दी करण्याजोगी स्थिती नाही, लक्षात ठेवा असं करून आपण स्वतःला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला संकटात टाकत आहोत. वेळीच सुधारा, नाहीतर वेळ वाईट असेल...! हा इशारा नाही, ही चिथावणी नाही तर इयत्ता 10 वी पर्यंत सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी प्रार्थना केल्यामुळे आपल्या सर्वांची काळजी आहे._*


◾ असं म्हणतात की, प्रत्येक १०० वर्षानंतर महामारीसारखे संकट मानवजातीवर येतच असते. एकोनीसाव्या शतकात आलेली प्लेगची बिमारी असेल किंवा त्यानंतर आलेल्या अनेक साथरोग आजारांच्या संकटांपेक्षा करोना या आजाराने आलेले संकट फार आणि फार मोठेच आहे. संपूर्ण जगात ४ लाखांपेक्षा अधिक लोक या आजाराने ग्रासले असून, त्यातील चार टक्के लोकांना मृत्यु पत्करावा लागला आहे. डिसेंबरमध्ये जेंव्हा चिनमध्ये या आजाराचा उदय झाला तेंव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे प्रत्येक महिन्याला दोन लाख लोकांना या आजाराची लागण होत आहे. भारतात कोरोना येईपर्यंत त्याला अटकाव करण्यासाठी काय करावे लागते? याची जवळपास कल्पना भारतीय शासन व्यवस्थेला आल्यामुळे लॉकडाऊनसारखा जालीम उपाय आपल्याला करता आलेला आहे. परंतू हे १३८ कोटी लोकांसाठी आणि त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून केलेला उपाय आहे हे लोकांनी समजून घ्यायला हवे.
◾ २२ मार्च रोजी जनता कर्फ्यु लावून एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात कर्फ्युचा प्रयोग यशस्वी होतो का? याची चाचपणी केंद्र सरकारने केली. जनता कर्फ्युला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे लागलीच २५ मार्च रोजी संपूर्ण देशात घोषीत कर्फ्यु लावला गेला. आता तर सर्वांना जिल्हाबंदीही करण्यात आली आहे. त्यापुढेही लोकांनी जावून ग्रामिण भागांतील काही गावांत लोकांनी गावबंदीसारखे अवैध प्रकार केले. म्हणजे भिती ही मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. शहरातील नागरीक मात्र जीवनावश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी शिथिल केलेल्या वेळेचा गैरफायदा घेत आहेत. या वेळेत अनेक लोक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. ही गर्दी करणं म्हणजे एकप्रकारे स्वत:वर संकट ओढवून घेणं आहे. कोरोना हा आजार संसर्गजन्य आहे. एकमेकांच्या जवळ गेल्याने लवकर पसरतो हे माहीत असतांनाही लोकं त्याची पर्वा न करता फळं आणि भाजीपाला खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. यामुळे संसर्गाचा धोका आहे हे प्रशासन घसा कोरडा करून सांगतंय. आहोरात्र डोळ्यात तेल घालून,  कुटूंबाची पर्वा न करता समाजाच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनाही याचा त्रास होतोय हे सर्वांनी जाणून घेतले पाहीजे.
◾ आपलं राज्य सरकार म्हणतंय की आपण आता तीसऱ्या स्टेजवर आहोत. तीसरी स्टेज म्हणजे ते तर महाभंकर संकट असणार आहे. या टप्प्यात आकडे शेकडोंच्या संख्येने पुढे येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करतायेत. आपली लोकसंख्या हे आपल्यासमोरील एक महासंकट आहे. शासनाने कितीही तळमळ केली तरी तोकड्या साधनांमुळे या संकटाशी सामना करणं हे काही सोपं काम नाही. म्हणून शासनही चिंतेत आहे. जागतीक स्तरावर वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत आघाडीवर असणारे देशही बेचिराख झाल्याचे आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय. आपण फक्त पाहतोय पण समजून घेत नाही असं होतंय का? हे स्वत:च्या मनाला प्रत्येकाने विचारायला हवं. ती वेळ आलेली आहे. शासन प्रशासनाला मदत म्हणून एकवेळ घरी बसू नका, परंतू आपल्या आईची, आपल्या परमप्रिय बायकोची, लाडक्या लेकाची-लेकीची, आजी-आजोबांची, भाऊ-बहिणींची काळजी असेल तर घरात बसा. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नका. कोरोना या आजाराचा संसर्ग हा वाटतो तेवढा सोपा समजून घेण्याची चूक करून घेवू नका. म्हणून कळकळीचे आवाहन आहे घरी बसा. स्वत:बरोबर आपल्या कुटूंबाला, आपल्या राज्याला आणि आपल्या देशाला या महामारीच्या संकटातून वाचवा. अजूनही वेळ गेली नाही... सुधारणा करा!


Popular posts
माणुसकीचा आधारवड!
Image
वाढदिवसाचा खर्च टाळून कु.गौरी अनिल लोमटे या विद्यार्थिनीने जय भारती प्रतिष्ठानच्या मोफत जेवण उपक्रमास स्वेच्छेने 2000/- रू केली मदत
आरोग्य सेतु अँप व्दारे शासनाने चालु केलेल्या कोरोना विरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा ----------अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे आवाहन
Image
शेतकरी आत्महत्याग्रस्त व वंचित कुटुंबांना मिळाला आधार ; आधार माणुसकीचा व धागा मैत्रीचा व पेशवा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने
Image
शिधापत्रिका नसलेल्या गोरगरीब कुटुंबाला मोफत राशनचे धान्य वाटप करा- अक्षय भुमकर